प्रवास सुखद तेव्हा होतो ,जेव्हा जागा सुंदर असतात आणि जागा सुंदर तेव्हाच वाटतात, जेव्हा तिथली माणसं आपलीशी वाटतात.खरोखरच जागा या माणसांमुळे खास बनतात आणि प्रवास हा एका योग्य सोबती मुळे... कारण 'सोबत' खरोखर च मॅटर करते आयुष्यात'...
केवळ दोन ठिकाणांमधला प्रवासच नव्हे तर "मैत्रीचा, प्रेमाचा, नात्यांचा प्रवास देखील तेव्हाच अर्थपूर्ण आणि सुंदर वाटायला लागतो, जेव्हा सोबतीला आपल्यासारखाच बेभान होणारा सहप्रवासी लाभतो".
"प्रवासातला सर्वात मोठा आनंद म्हणजे आपल्यासारखाच बेभान होणारा सहप्रवासी भेटणं".. हे वपुंच वाक्य काही वर्षांपूर्वी पुस्तकामध्ये वाचलेलं, त्याची अनुभुती मात्र खर्या अर्थाने फिल्ड विझीट वेळी जाणवते..
आम्ही दोघी..
आठ दिवसाच्या फिल्डवर्क साठी एक महिना भटकलो, मिळेल तशी स्थानिक वाहनं, जेमतेम खाणं, तात्पुरती झोप, उन्हाळा, मोठ्या दोन बॅग्ज, ग्रामीण भाग आणि कितीतरी साईट्स.. प्रत्येक गोष्टी ची गैरसोय असुन ही फिरणं थांबल नाही, आपण थांबवल नाही, actually गैरसोय झाल्याशिवाय फिरणं काय असतं कळत ही नसत..उन्हाळ्यात भर दुपारी मेन हायवे वरुन, तर कधी खेड्यांच्या पायवाटेने, कधी गावातील लहान रस्त्यांवरुन मोठ्या बॅग्ज घेऊन चालत राहण आपल्या साठी कधी च hectic नव्हत, त्या ही परिस्थितीत तो क्षण आपण बिनधास्त जगला, कितीतरी चर्चा करत ते क्षण आयुष्याभरासाठी मैत्रीच्या कुपीत बंद केले.. कधी प्रगल्भ व्यक्ती सारख्या चर्चा, तर कधी लहान मुलांसारख्या टिंगलटवाळक्या.. परिस्थिती कशीही असो, आपण हसणं आणि फिरणं कधीही थांबवल नाही, मुळात त्या थांबवण्यासारख्या गोष्टी च नाहीएत अस मला वाटत.. कितीतरी अडचणी आल्या पण आपण त्यावर ही खदखदुन हसायचो, उगाच किरकिर आणि नशिबाला दोष देत बसणारे आपण नव्हतो आणि कदाचित त्यामुळे च आपला प्रवास अर्थपुर्ण झाला. मैत्री ची कितीतरी रंग सोबत अनुभवली, मनापासून जगली..
अजिंठ्याच्या लेण्यांपासुन ते अन्वा मंदिरापर्यंत कितीतरी चर्चा रंगत असतं, आणि येथे च खऱ्या अर्थाने एकमेकांची प्रगल्भता, वैचारिक पातळी, विचारांची खोली जाणवू लागते आणि प्रवास अर्थपुर्ण होऊ लागतो.. ह्या सगळ्यांत एक गोष्ट अशी घडली की आपलं नातं प्रगल्भ झालं. मैत्रीच्या परिसीमा गाठल्या त्या ह्याच field visit मध्ये. दोघींचे plus minus points कळले..असं म्हणतात ना की खरी मैत्री तीच जी माणसाला त्याच्या गुण दोषांसकट स्वीकारते, आणि ह्या प्रवासात हे खूप जवळून अनुभवता आलं आणि नातं बहरू लागलं.... कायम हा प्रवास लक्षात राहील आणि असे अनेक प्रवास घडो एकमेकींच्या साथीने...
Written by आम्ही दोघी ❤
No comments:
Post a Comment